shree purohit

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सोमवार, १ मार्च, २०२१

सोयर- सुतक किती दिवस पाळावे?

 

खालील माहिती निर्णयसिंधु -धर्मसिंधु या ग्रंथाप्रमाणे दर्शविली आहे.


सोयर- सुतक किती दिवस पाळावे?

 

जनसुतक अशौच पालन व निवृत्ती!


( सुतक या अर्थाने अशौच असा शब्द पूर्वीच्या ग्रंथातून वापरलेला आहे. तसेच काही ग्रंथातून आशौच असा देखील शब्द वापरला आहे. शब्द कोशामध्ये देखील दोन्ही शब्द हे सुतक याकरिता समानार्थी आहेत सध्या सर्वत्र हा अशौच

 शब्द प्रचलित असल्यामुळे तो येथे घेतलेला आहे.


●अशौचाचा पहिला दिवस कोणता मानावा?


●मध्यममानाने उत्तर रात्री ( पहाटे) तीन वाजेपर्यंत जन्म /मृत्यू झाले असेल तर आधीचा दिवस पहिला मानावा आणि पहाटे तीन नंतर उजाडता दिवस पहिला मानावा.


● मृत्यू झाल्यापासून अशौच सुरू होते .दहनापासून नाही.


●१,४,किंवा १० दिवसांचे अशौच ज्यांना आहे त्यांना ते  अशौच तीन किंवा दहा दिवसांमध्ये कळलेले असता उरलेल्या दिवसांत यांची शुद्धी होते . उदाहरणार्थ 10 दिवसांची मृताशौच सहाव्या दिवशी कळले तर त्यांनी उरलेले चार दिवस पाळावे .अशौच समाप्तीनंतर कळल्यास स्नानाने शुद्धी करावी.

सात पिढ्यांपर्यंत / नातेसंबंध असलेल्यांनी दहा दिवस पालन करावे.


सुतक :-

सख्ये नाते संबंध म्हणजे -आई -वडील, मुलगा- मुलगी,भाऊ-बहीण ,सून, पती-पत्नी, आणि एकत्र कुटुंब असता नात-नातू इ. सख्ये नातेसंबंधातील नातेवाईक यांना दहा दिवसाच्या अशौच तसेच एका घरात राहत असल्याने स्पर्शास्पर्श दोष असल्याने दहा दिवसाचे अशौच पाळावे.


सोयर 

 मूल जन्माला आल्यावर फक्त आईला व पित्याला दहा दिवस सोयर पाळावे. त्याशिवाय सख्ख्या नाते संबंधित राहणा-यांना कोणालाही सोयर नाही त्यांना स्नान शुद्धी करावी.जन्म झाल्यावर दहा दिवसात मृत झाल्यास फक्त माता-पिता यांनी सोयर पाळावे.


माहिती आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा आपल्यालाही काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा.


●१० दिवसा नंतर शुद्धी करताना पाण्यात थोडेसे गोमूत्र टाकून स्नान करावे. अथवा तुळशीचे पान अंघोळीच्या पाण्यात घालून स्नान करावे व तुळशीचे पान खावे अथवा आपल्या घरामध्ये सून असेल ते सोनं पाण्यामध्ये उकळून एक ते दोन चमचा आंघोळीच्या पाण्यात घालून सांग करावे नंतर एक जन्म सुवर्ण पासून पाणी प्यावे असे केल्यास तरीही आपली शरीर शुद्धी होत असते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जिन लोगों को आप बहुत बड़ा समझते हैं,और जिनका नाम बहुत बड़ा है असल में वह कभी बड़े नही होते.क्योंकि वह बड़ी बड़ी बातें करते है पर उस का आत्मसात न...