shree purohit

Enter your email address:

Delivered by FeedBurner

गुरुवार, ४ मार्च, २०२१

 🌺अभंग सरिता🌺

            ७४


लाओनीया चंदन । वरवर करीता पूजन ।

मुक्तीचे ते धन । न मिळे कोणासी ।।१।।


मुख ते जरी सुंदर । अंतरी कपटाचा ज्वर ।

हे सारेची लटम्बर । देवास भूलवित नाही ।।२।।


अहो संस्कार उत्तम । घड़वी पुरुषोत्तम ।

जीवन हे सुगम । चाले झाक पहा ।।३।।


करीता गुरु करावा । ध्यानी राम धरावा ।

सन्मार्ग आचरावा । साधकाने ।।४।।


परी तयात अडकु नये । जग हे सत्य नव्हे ।

सूदाम्याचे पोहे । कृष्णास आवडी।।५।।


का की तो सत्यनिष्ठ । भक्त असे एकनिष्ठ ।

मुखी सदा कृष्ण कृष्ण । नाम घेतसे तो ।।६।।


योगी म्हणे भक्ताविन । देवास नसे देवपन ।

हे सर्वची सद्गुरुविन । कळने शक्य नाही ।।७।।


🌺श्री राम जय राम जय जय राम🌺

                  🌺👣🌺

   🌺🙏🏻श्री गुरुदेव माउली🙏🏻🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जिन लोगों को आप बहुत बड़ा समझते हैं,और जिनका नाम बहुत बड़ा है असल में वह कभी बड़े नही होते.क्योंकि वह बड़ी बड़ी बातें करते है पर उस का आत्मसात न...