नमसकार मंडळी आज आपण विवाह शीघ्र व्हावा यासाठी मी काही उपाय आपल्याला सांगत आहे .हे उपाय ज्यांची श्रद्धा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करून पाहिले पाहिजे .आणि त्यांना अंधश्रद्धा वाटते त्यांना कृपया विनंती आहे की तुम्ही काही उपाय करू नका .परंतु त्याबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची कॉमेंट तुम्ही अजिबात करू नका.ज्यांची इच्छा असेल त्यांनीच उपाय करावेत. मला माझ्या आजोबा वडील आणि त्यांची असे सांगता-सांगता माझ्या पर्यंत आलेली माहिती मी ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा मानस नाही .श्रद्धेने करुन पहा .ज्या मंडळींना मी सांगितले आहे .त्यांनी त्याचे चांगले अनुभव घेतले आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय करण्यास कोणालाही खर्च येणार नाही.कोणालाही कुठलं आर्थिक - मानसिक आणि शारीरिक नुकसान होणार नाही. त्यामुळे आपण हे उपाय करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते आम्हाला जरुर कळवा. काही महत्त्वाच्या गोष्टी मुला-मुलींची जेव्हा विवाह करण्याची वेळ येते . तेव्हा मुलाकडून आणि मुलीकडून यांच्या फार मोठा प्रचंड अपेक्षा असतात .त्या अपेक्षा इतके असतात, की त्या सगळ्या अपेक्षा परिपूर्ण होणारी एखादी स्त्री जेव्हा एखादा पुरुष सापडणे फारच अवघड असते. विवाह करताना ध्यानात ठेवावं की विवाह म्हणजे एक प्रकारची जीवनातील ऍडजेस्टमेंट असते.विवाहानंतर कितीही मनासारखं झालं तरी ऍडजेस्टमेंट करावीच लागते. विवाहापूर्वी कुठेतरी आपण कॉम्प्रमाईज करायला शिकायला हवं.
ते आपल्या मनाप्रमाणे कधीच मिळत नसतं त्यामुळे आपण आपल्या मनाची तयारी ठेवावी व कुठे ना कुठेतरी कॉम्प्रमाईज करून जीवनामध्ये विवाहासाठी तयार व्हाव. अन्यथा असं पाहिजे च्या नावाखाली वय निघून गेलं तरी सुद्धा विवाह होणार नाही. आणि अशा प्रकारच्या केसेस मी ज्यावेळेस ज्योतिषविषयक प्रॅक्टिस करतो तेव्हा पाहतो आणि मग ही मंडळी ग्रहांना आई-वडिलांना इतर गोष्टींना तोंड देत बसतात.
जर आपल्या उपवर कन्या व पुत्राच्या कुंडलीमध्ये विलंब कारक ग्रहयोग प्रबळ असतील आणि त्यामुळे त्याचे त्यांच्या विवाहनिश्चितीसाठी अत्याधिक विलंब होत असेल, तर मातापित्यांनी आपल्या कन्या व पुत्राकडून खालील ज्योतिष उपाय करून घ्यावेत . असे केल्याने त्यांच्या साठी शीघ्र विवाह योग निर्मिती होते ,अशी शास्त्रात मान्यता आहे .
🌟शीघ्र विवाह हेतू दुर्गासप्तशती च्या खालील मंत्राचा रोज १०८ वेळा जप करावा. शुक्ल पक्षातील मंगळवारपासून सुरू करून सलग सोळा दिवस करावा.
मन्त्र :-पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्।
तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्॥
🌟रोज रात्री खालील मंत्राचा जप नियमितपणे वेळा करावा.
मन्त्र :-ह्रीं क्रीं द्रां द्रीं क्लीं क्लुं जं जं ल l
वनाख्ये कामेश्वरी वाग्देवते स्वाहा l l.
🌟 केळीच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा .व खालील मंत्र जप करावा जेणेकरून गुरुबल वाढेल.
मन्त्र:- देवानाम च ऋषिणाम च गुरुं कांचन सन्निभम।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।
ॐ बृं बृहस्पतये नमः।।
🌟विवाह इच्छुक कन्या - पुत्राने गुरुवारी आपल्या अंगावर जास्तीत जास्त पिवळे वस्त्र धारण करावे. जवळ पिवळा रुमाल ठेवावा. विवाहाची बोलणी करायला आलेल्या पाहुण्यांना घरात अशाप्रकारे बसवावे,की त्यांचे तोंड घराच्या आतील बाजूस व्हावे.त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिसु नये.
🌟जर कन्येचा विवाह अडचणी येत असतील तर पाच नारळ घ्यावेत.महादेवाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवावेत.
त्या नन्तर 'ॐ श्री वर प्रदाय श्री नाम'
या मंत्राचा पाच माळ जप करावा व नंतर ते पाच नारळ महादेवाच्या मंदिरात अर्पण करावेत.
🌟विवाह व्हावा यासाठी प्रत्येक गुरुवारी विवाहोस्तुक कन्या किंवा पुत्राने अंघोळीच्या पाण्यात एक चिमुट हळद टाकून स्नान करावे व स्नानानंतर केशरयुक्त मिठाईचे सेवन करावे असे ज्योतिषशास्त्र मध्येही मान्यता आहे.
🌟आई वडिलांना दररोज नमस्कार करावे.पाया पडताना आई वडिलांना पाया पडतो आई पाया पडतो बाबा असे सांगून नमस्कार करावे.
केळीच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा .
🌟विड्याच पान व सुपारी घेऊन सोमवारी शिवलिंगाची २१ सोमवार पूजक करावी.
🌟सात गुरुवारी गव्हाच्या पिठाचे २छोटे गोळे करावे,त्यावर हळद,गूळ आणि हरभरा डाळ हे सर्व साहित्य आपल्या हाताने उपवर वधू- वराने गाईला खाऊ घालावे .आणि नमस्कार करून माझं विवाह लवकर व्हावं व चांगलं स्थळ मिळावं असे मनात इच्छा करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा