🌸🏠 वास्तुसाठी जमीन कशी निवडावी🏠🌸
पुढील प्रकरणे वाचण्यापूर्वी जमीन कशी निवडावी?
हे ही पाहणे गरजेचे आहे आपण घेत असलेला प्लॉट शक्यतो चौरस किंवा आयताकृती असावा .काळी माती शक्यतो नसावी ,कारण काळ्यामातीत पाया लागत नाही आणि होणारा बराचसा खर्च हा पाहत जातो, परंतु काळ्यामातीत चार ते पाच फुटांवर पायाला लागला तर मग उत्तमच मग वास्तू बांधण्यात हरकत नाही.
प्लॉट घेताना मूळ वास्तू समाधीची जागा ,स्मशानभूमीची जागा किंवा पुरातन वास्तू पाडून सपाटीकरण केले असेल तर अशा वास्तू टाळाव्यात. शक्यतो रिसेल वास्तू घेऊ नये. ज्या वास्तूमध्ये वारुळ, मुंग्यांचे वारूळ अशी सुद्धा खूप त्रासदायक ठरू शकते . वास्तू तर लाल जर मुरमाने युक्त असेल तर उत्तम.रिसेल वास्तू घेतल्यास त्यात कोणी आत्महत्या केलेली नसावी किंवा निपुत्रिक किंवा शापित किंवा तळतळातीने बळकावलेली वास्तू रिसेल मध्ये स्वस्तात मिळते ,पण म्हणून घेऊ नये .आपल्या वास्तूवर कोणत्या देवळाची ,चर्चेची , मशिदीची किंवा कोणतेही पवीत्र स्थानांची सावली पडता कामा नये ,किंवा पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारासमोर असलेली होऊ नये ,आणि ईश्वराच्या नजरेस शक्तीमुळे वास्तूत विचित्रअसे परिणाम होतो. काही लोक वास्तूमध्ये देऊळ बांधले पण तेही आयोग्य आहे.वास्तुभोवतली देऊळ समाधी किंवा कोणत्याही धर्माचे पवित्र स्थान नसावे.प्लॉट घेताना तो ओबडधोबड नसावा .उंच-सखल प्लॉट नाईलाजाने घेतला तर तो भरू भरून सरळ करावा व तितके व ते शक्य नसेल तर उंच-सखल प्लॉट घेऊ नये.
शाडूची माती चार फुटांपेक्षा जास्त अंतरावर लागली तर उत्तम . मुरमाड माती आणि खडकाळ जमीन उत्तम ठरते . जमीन (प्लॉट) घेतल्यानंतर प्रथम पाच बाय पाच फूट आकाराचे असे पाच भूमी मालकाच्या कमरे एवढे खड्डे करावेत. नंतर त्यात पाणी भरून पाहावे पाने भराभर जमीन खराब आहे .आणि हळूहळू जिरवले तर ते मध्यम आहे .आणि खूप उशिरापर्यंत पाणी खड्ड्यात राहिले तर अशी भूमी सर्वोत्तम आहे.
नंतर याच खड्ड्यातून निघालेली भर पुन्हा खड्यामध्ये भरावी .खड्डा पूर्ण भरून वर्मा ती आली तर जमीन उत्तम समजावे .खड्डा पूर्ण भरलाच नाही शिवाय थोडा भरायला राहिला तर अशी जागा अयोग्य .वास्तू (भूमी )घेतल्यानंतर जर आपण परीक्षण केले आणि निराशाजनक उत्तर आले तर नाराज न होता खड्यामध्ये बाहेरून माती आणून भरावी त्याचबरोबर त्या खड्ड्यात पाचमोती,पाच कडधान्य पाच रत्ने ,मध,साखर,केशर,अत्तर, टाकून खड्डा बंद करावा. वास्तू परीक्षणामध्ये मातीचे परीक्षणनही तेवढेच महत्वाचे आहे .आपण प्लॉट घेणार असेल तर किंवा घेतला असेल तर मातीचे परीक्षण जाणकारांकडून करून घ्यावे.
जमिनीचे (प्लॉट) काही आकार ची माहीती
जमिनीचे (प्लॉट) आकार चौकोनी ,आयताकृती ,त्रिकोणी गोमुखी, व्याघ्र मुखी, कूर्मपृष्ठी, धनुष्याकृती, अर्धगोलाकार षटकोनी, अष्टकोनी, एल टाईप ,टी टाईप वगैरे असतात .
आज-काल डोंगरावर घरे बांधण्याची हौस पाहण्यात येते.
पण डोंगरावरील घरे म्हणावी तेवढी सुखी आढळत नाही . घरगुती ताण-तणाव आणि भाऊबंदकी अगर व्यापरातल्या राजकारणांना बळी पडतात अशा वास्तू काही काळापुरते केवळ सुटीचा आनंद म्हणून वापरल्या गेल्या तरच उत्तम.
जमिनीला भूमीला एका प्रकारचा वास येतो. त्यानुसार वास्तू परीक्षण काळीभोर माती आणि तेलासारखा। वास येत असेल तर अशी जमीन फक्त शेतीसाठी योग्य आहे. लाल मुरमाड भूमी आणि मधासारखा वास येत असेल तर राहण्यास फार उत्तम. मातीचा सुंदर वास येत असेल तर भरभराटकारक जमीन असे वास्तू परिक्षणनाचे विविध ठोकताळे आहेत. माती हे अनुक्रमे दूध ,पाणीमध यामध्ये भिजून पाण्याचे शिंतोडे मारून त्यात गहू व बार्ली पेरावेत . त्या मातीत गहू प्रथम उगवून आल्यास उत्तम आणि बार्ली प्रथम आल्यास मध्यम.
🙏🙏धन्यवाद🙏🙏
⚜️⚜️शुभं भवतु⚜️⚜️
माहिती आवडल्यास अवश्य कॉमेंट्स करा व आपल्याला वास्तु,ज्योतिष,व अध्यात्मिक काही प्रश्न असल्यास अवश्य संपर्क साधावा.
facebook page
https://www.facebook.com/शास्त्री-गुरुजी-100335455444385/
Whatsapp Link
https://wa.me/message/COCUPN3HXQ3CP1
माहिती आवडल्यास अवश्य Like करा आणि इतरांना forward करा.
ज्योतिर्विद :-शास्त्री गुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा