ॐवास्तुपुरुषाय नमः
वास्तुशास्त्राप्रमाणे शास्त्रकारांनी जो दिशेचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी त्यामध्ये त्या-त्या दिशेला असलेल्या ऊर्जेचा अभ्यास करून त्या वास्तुमधील सकारात्मक उर्जेचा उपयोग त्या मध्ये राहणाऱ्या लोकांना कसा जास्तीत जास्त होईल .लक्षात ठेवून अभ्यास केलेल्या विविध गोष्टींची याचना करावयास त्यानुसार त्यांनी सांगितलेले आहेत. यामध्ये महत्त्वाचा विषय देव्हारा आहे .
ज्या भगवंतांनी आपल्यावर कृपा करून आपणास वास्तू मिळवून दिली जीवनातील सर्व घटनांवर आणि कृत्यामुळे त्याची नजर आहे ,जो आपणास संकटातून मुक्त करतो , अशा परमेश्वरास आपल्या घरात त्याचे स्वतःचे वेगळे घर असणे केव्हाही चांगलेच देवघर बंगला किंवा घराच्या ईशान्य कोणात असावे.पूर्वेस तोंड करून म्हणजे पश्चिमेला दार असेल तर उत्तमच. फक्त दक्षिणाभिमुख देव्हारा ठेवू नका .
ईशान्य कोपऱ्याच्या खोलीत पश्चिमेस देवांचे मुख करून किंवा पूर्वेस देवांचे मुख करून ठेवावे ईशान्य खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात देवाची समई किंवा दिवा लावावा.
जागेअभावी दोन किंवा तीन खोल्या असतील तर शक्यतो कोणत्याही खोलीच्या ईशान्येला देवघराची रचना करावी.
छोटे देवघर असल्यास ते जमिनीवर ठेवावे लटकावून अडकवून ठेवू नये .देव्हाऱ्यावर अपवित्र वस्तू किंवा अडगळवस्तु ठेवू नये. कित्येक घरात मी देव पाहिले आहेत पण त्या देवांची कधी पूजा होत नसावी अशी अवस्था असते म्हणून देवघर स्वच्छ व सुंदर, पवित्र असावे.
रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी .रोज एक तेलाचा दिवा किंवा तुपाचे निरांजन लावले तर फारच उत्तम. दर गुरुवारी धूप जाळावा. जुने जीर्ण आणि खराब बंगले फोटो अगर मूर्ती किंवा एकापेक्षा जास्त मूर्ती विधिविहित विसर्जित कराव्यात.
नैऋत्य कोपर्यात देवघर झाडण्यासाठी चा झाडू ठेवावा.
वायव्य कोपर्यात सहाण चंदन ठेवावे .ईशान्य कोपर्यात पाण्याचे भांडे किंवा भरलेल्या तांब्याचा कलश ठेवावा.
दक्षिणेला तोंड करून कोणत्याही देवतांच्या तसबीरी किंवा मूर्ती ठेवू नये . दैवतांची मुख एकमेकांसमोर येतील असे ठेवू नये. पूजा घरास लाकडाचा उंबरठा अवश्य करून घ्यावा. दर पौर्णिमेला या उंबरठ्यात गोमूत्रात हळद कालवून त्याचा लेप लावावा .स्त्रियांच्या मासिक पाळी मध्ये देवघरात जाऊ नये देवघरात बसून शिव्याशाप तळतळाट देऊ नये.
जास्तीत जास्त ध्यानधारणा व नामस्मरण करावे. देवाला लावल्या जाणाऱ्या उदबत्त्याही मंद सुगंध देणाऱ्या असाव्यात.उग्र नसाव्यात. देवघरात नैवेद्य दाखवा पण देवघरात बसून जेवू नये. देवघरात जाण्यापूर्वी पाय धुऊन जावे मद्यपान मांसभक्षण संभोग केल्यानंतर देवघरात जाऊ नये. देवघरात जाण्यासाठी दोन द्वारे असावेत म्हणजे शटरटाईप असावे हेशटर सागाच्या लाकडाची असावे देवघरात शिव शंकराचे लिंग असावे, पण शंकराचा फोटो शक्यतो नसावा ,कारण भगवान शंकर स्मशान प्रिय आहे ते विरागी आहेत.
तसेच त्यांच्या मूर्ती किंवा प्रतिमेचे पूजन होणार नाही असा शंकर भगवान शाप आहे, म्हणून शिवलिंग पूजन ठेवावे व शिवलिंगाची टोकाची बाजू उत्तरेस असावी. देवघरात उभ्या मूर्ती नसाव्यात सर्व विराजमान झालेल्या असावे .रोजच्या पूजेत घंटेचा किणकिणाट करावा. आपल्याकडे पूर्वापार शंख असेल तर रोजच्या रोज पाणी भरून पूजेत ठेवावा ,पण आपणास शंख पूजन माहीत नसले तर स्वतःच्या मनाने करू नये .
कोणतेही देवघराची जेवढे पावित्र्य राखले जाईल, तेवढे आपल्या वास्तुमध्ये आपण शांतता नी समाधान लाभेल. वास्तुशास्त्राप्रमाणे कोणतेही खोलीची मांडणी करताना नेहमी लक्षात ठेवावे ,की ईशान्येला पवित्रता ,आगन्येला अग्नि, नैऋत्येस जड, बोजड वायव्येला दरवाजा किंवा खिडकी, दक्षिण वर्ज्य,उत्तर सर्वोत्तम, पूर्व आणि पश्चिम उत्कृष्ट सर्व वास्तुशास्त्र याच नियमांभोवती फिरत राहते.
देवघरामध्ये कासवावरील श्रीयंत्र (स्फटिकाचे)असेल तर लक्ष्मीसपुरवठा येतो.
देवघरात नुसतेच शंकराची पिंड नसावी त्याबरोबर नाग व नंदी असावा.
आपल्या भाग्यंका नुसार भाग्य यंत्र देवघरात असावे .त्या बाबत माहिती आपण घेणार आहोत.
चॅटिंग मशीन (मंत्र फोटो) द्वारेआपल्या आराध्य देवतांचे सतत नामस्मरण ठेवावे.
उदा:-गण गण गणात बोते .
🙏 धन्यवाद .🙏
शुभं भवतु.
आपल्याला वास्तु,ज्योतिष,व अध्यात्मिक काही प्रश्न असल्यास अवश्य संपर्क साधावा.
facebook page
https://www.facebook.com/शास्त्री-गुरुजी-100335455444385/
Whatsapp Link
https://wa.me/message/COCUPN3HXQ3CP1
माहिती आवडल्यास अवश्य Like करा आणि इतरांना forward करा.
ज्योतिर्विद :-शास्त्री गुरुजी
khoop chaan great
उत्तर द्याहटवाखूप खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखुप सुंदर आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhup chan guruji
उत्तर द्याहटवाThank you
हटवासमाज सेवा हीच ईश्वरी सेवा
हटवाKhoop chan upkram suru kela ahe guruji
उत्तर द्याहटवाThank you sirq
हटवाDevgharavishe lokanmadhe khoop adyan hote te hee problem apan door karavt hee namra vinanty
उत्तर द्याहटवाहो नक्की मला पण आवडेल
हटवाShree swami samrth 💐💐🌹🌺🌸🌼💮
उत्तर द्याहटवाश्री स्वामी समर्थ
हटवाAk numbr
उत्तर द्याहटवा