shree purohit

Enter your email address:

Delivered by FeedBurner

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

विवाहशीघ्र व्हावा यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय तोडगे आहे. अनेकांचा प्रश्न होता त्याला असनुसरून सांगितले आहे.

 नमसकार मंडळी आज आपण विवाह शीघ्र व्हावा यासाठी मी काही उपाय आपल्याला सांगत आहे .हे उपाय ज्यांची श्रद्धा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करून पाहिले पाहिजे .आणि त्यांना अंधश्रद्धा वाटते त्यांना कृपया विनंती आहे की तुम्ही काही उपाय करू नका .परंतु त्याबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची कॉमेंट तुम्ही अजिबात करू नका.ज्यांची  इच्छा असेल त्यांनीच उपाय करावेत. मला माझ्या आजोबा वडील आणि त्यांची असे सांगता-सांगता माझ्या पर्यंत आलेली माहिती मी ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा मानस नाही .श्रद्धेने करुन पहा .ज्या मंडळींना मी सांगितले आहे .त्यांनी त्याचे चांगले अनुभव घेतले आहे.

 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय करण्यास कोणालाही खर्च येणार नाही.कोणालाही कुठलं आर्थिक - मानसिक आणि शारीरिक नुकसान होणार नाही. त्यामुळे आपण हे उपाय करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते आम्हाला जरुर कळवा. काही महत्त्वाच्या गोष्टी मुला-मुलींची जेव्हा विवाह करण्याची वेळ येते . तेव्हा मुलाकडून आणि मुलीकडून यांच्या फार मोठा प्रचंड अपेक्षा असतात .त्या अपेक्षा इतके असतात, की त्या सगळ्या अपेक्षा परिपूर्ण होणारी एखादी स्त्री जेव्हा एखादा पुरुष सापडणे फारच अवघड असते. विवाह करताना ध्यानात ठेवावं की विवाह म्हणजे एक प्रकारची जीवनातील ऍडजेस्टमेंट असते.विवाहानंतर कितीही मनासारखं झालं तरी ऍडजेस्टमेंट करावीच लागते.  विवाहापूर्वी कुठेतरी आपण कॉम्प्रमाईज करायला शिकायला हवं.

ते आपल्या मनाप्रमाणे कधीच मिळत नसतं त्यामुळे आपण आपल्या मनाची तयारी ठेवावी व कुठे ना कुठेतरी कॉम्प्रमाईज करून जीवनामध्ये विवाहासाठी तयार व्हाव. अन्यथा असं पाहिजे च्या नावाखाली वय निघून गेलं तरी सुद्धा विवाह होणार नाही. आणि अशा प्रकारच्या केसेस मी ज्यावेळेस ज्योतिषविषयक प्रॅक्टिस करतो तेव्हा पाहतो आणि मग ही मंडळी ग्रहांना आई-वडिलांना इतर गोष्टींना तोंड देत बसतात.

जर आपल्या उपवर कन्या व पुत्राच्या कुंडलीमध्ये विलंब कारक ग्रहयोग प्रबळ असतील आणि त्यामुळे त्याचे त्यांच्या विवाहनिश्चितीसाठी अत्याधिक विलंब होत असेल, तर मातापित्यांनी आपल्या कन्या व पुत्राकडून खालील ज्योतिष उपाय करून घ्यावेत . असे केल्याने त्यांच्या साठी शीघ्र विवाह योग निर्मिती होते ,अशी शास्त्रात मान्यता आहे .


🌟शीघ्र विवाह हेतू  दुर्गासप्तशती च्या खालील मंत्राचा रोज १०८ वेळा जप करावा. शुक्ल पक्षातील मंगळवारपासून सुरू करून सलग सोळा दिवस करावा.

 

मन्त्र :-पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्। 

तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्॥


 🌟रोज रात्री खालील मंत्राचा जप नियमितपणे वेळा करावा.


मन्त्र :-ह्रीं क्रीं द्रां द्रीं क्लीं क्लुं जं जं ल l

         वनाख्ये कामेश्वरी वाग्देवते स्वाहा l l.


🌟 केळीच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा .व खालील मंत्र जप करावा जेणेकरून गुरुबल वाढेल.


मन्त्र:- देवानाम च ऋषिणाम च गुरुं कांचन सन्निभम।

        बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।


       ॐ बृं बृहस्पतये नमः।।


🌟विवाह इच्छुक कन्या - पुत्राने गुरुवारी आपल्या अंगावर जास्तीत जास्त पिवळे वस्त्र धारण करावे. जवळ पिवळा रुमाल ठेवावा. विवाहाची बोलणी करायला आलेल्या पाहुण्यांना घरात अशाप्रकारे बसवावे,की त्यांचे तोंड घराच्या आतील बाजूस व्हावे.त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिसु नये.


🌟जर कन्येचा विवाह अडचणी येत असतील तर पाच नारळ घ्यावेत.महादेवाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवावेत.

 त्या नन्तर 'ॐ श्री वर प्रदाय श्री नाम'

या मंत्राचा पाच माळ जप करावा व नंतर ते पाच नारळ महादेवाच्या मंदिरात अर्पण करावेत.


🌟विवाह व्हावा यासाठी प्रत्येक गुरुवारी विवाहोस्तुक कन्या किंवा पुत्राने अंघोळीच्या पाण्यात एक चिमुट हळद टाकून स्नान करावे व स्नानानंतर केशरयुक्त मिठाईचे सेवन करावे असे ज्योतिषशास्त्र मध्येही मान्यता आहे.


🌟आई वडिलांना दररोज नमस्कार करावे.पाया पडताना आई वडिलांना पाया पडतो आई पाया पडतो बाबा असे सांगून नमस्कार करावे.

 केळीच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा .


🌟विड्याच पान व सुपारी घेऊन सोमवारी शिवलिंगाची २१ सोमवार पूजक करावी.


🌟सात गुरुवारी गव्हाच्या पिठाचे २छोटे गोळे करावे,त्यावर हळद,गूळ आणि हरभरा डाळ हे सर्व साहित्य आपल्या हाताने उपवर वधू- वराने गाईला खाऊ घालावे .आणि नमस्कार करून माझं विवाह लवकर व्हावं व चांगलं स्थळ मिळावं असे मनात इच्छा करावी.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

shastriGuruji27feb2021

 🌸🏠 वास्तुसाठी  जमीन कशी निवडावी🏠🌸

 पुढील प्रकरणे वाचण्यापूर्वी जमीन कशी निवडावी?

 हे ही पाहणे गरजेचे आहे आपण घेत असलेला प्लॉट शक्यतो  चौरस किंवा आयताकृती असावा .काळी माती शक्यतो नसावी ,कारण काळ्यामातीत पाया लागत नाही आणि होणारा बराचसा खर्च हा पाहत जातो, परंतु काळ्यामातीत चार ते पाच फुटांवर पायाला लागला तर मग उत्तमच मग वास्तू बांधण्यात हरकत नाही.

प्लॉट घेताना  मूळ वास्तू समाधीची जागा ,स्मशानभूमीची जागा किंवा पुरातन वास्तू पाडून सपाटीकरण केले असेल तर अशा वास्तू टाळाव्यात. शक्यतो रिसेल वास्तू घेऊ नये. ज्या वास्तूमध्ये वारुळ, मुंग्यांचे वारूळ अशी सुद्धा खूप  त्रासदायक ठरू शकते . वास्तू तर लाल जर मुरमाने युक्त असेल तर उत्तम.रिसेल वास्तू घेतल्यास त्यात कोणी आत्महत्या केलेली नसावी किंवा निपुत्रिक किंवा शापित किंवा तळतळातीने बळकावलेली वास्तू रिसेल मध्ये स्वस्तात मिळते ,पण म्हणून घेऊ नये .आपल्या वास्तूवर कोणत्या देवळाची ,चर्चेची , मशिदीची किंवा कोणतेही पवीत्र स्थानांची सावली पडता कामा नये ,किंवा पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारासमोर असलेली होऊ नये ,आणि ईश्वराच्या नजरेस शक्तीमुळे वास्तूत  विचित्रअसे परिणाम होतो. काही लोक वास्तूमध्ये देऊळ बांधले पण तेही आयोग्य आहे.वास्तुभोवतली देऊळ समाधी किंवा कोणत्याही धर्माचे पवित्र स्थान नसावे.प्लॉट घेताना तो ओबडधोबड नसावा .उंच-सखल प्लॉट नाईलाजाने घेतला तर तो भरू भरून सरळ करावा व तितके व ते शक्य नसेल तर उंच-सखल प्लॉट घेऊ नये.

शाडूची माती चार फुटांपेक्षा जास्त अंतरावर लागली तर उत्तम . मुरमाड माती आणि खडकाळ जमीन उत्तम ठरते . जमीन (प्लॉट) घेतल्यानंतर प्रथम पाच बाय पाच फूट आकाराचे असे पाच भूमी मालकाच्या कमरे एवढे खड्डे करावेत. नंतर त्यात पाणी भरून पाहावे पाने भराभर जमीन खराब आहे .आणि हळूहळू जिरवले तर ते मध्यम आहे .आणि खूप उशिरापर्यंत पाणी खड्ड्यात राहिले तर अशी भूमी सर्वोत्तम आहे.

नंतर याच खड्ड्यातून निघालेली भर पुन्हा खड्यामध्ये भरावी .खड्डा पूर्ण भरून वर्मा ती आली तर जमीन उत्तम समजावे .खड्डा पूर्ण भरलाच नाही  शिवाय थोडा भरायला राहिला तर अशी जागा अयोग्य .वास्तू (भूमी )घेतल्यानंतर जर आपण परीक्षण केले आणि निराशाजनक उत्तर आले तर नाराज न होता खड्यामध्ये  बाहेरून माती आणून भरावी त्याचबरोबर त्या खड्ड्यात पाचमोती,पाच कडधान्य पाच रत्ने  ,मध,साखर,केशर,अत्तर, टाकून खड्डा बंद करावा. वास्तू परीक्षणामध्ये मातीचे परीक्षणनही तेवढेच महत्वाचे आहे .आपण प्लॉट घेणार असेल तर किंवा घेतला असेल तर मातीचे परीक्षण जाणकारांकडून करून घ्यावे.

जमिनीचे (प्लॉट) काही आकार ची माहीती 


जमिनीचे (प्लॉट) आकार चौकोनी ,आयताकृती ,त्रिकोणी गोमुखी, व्याघ्र मुखी, कूर्मपृष्ठी, धनुष्याकृती, अर्धगोलाकार षटकोनी, अष्टकोनी, एल टाईप ,टी टाईप वगैरे असतात .

आज-काल डोंगरावर घरे बांधण्याची हौस पाहण्यात येते.

पण डोंगरावरील घरे म्हणावी तेवढी सुखी आढळत नाही . घरगुती ताण-तणाव आणि भाऊबंदकी अगर व्यापरातल्या राजकारणांना बळी पडतात अशा वास्तू काही काळापुरते केवळ सुटीचा आनंद म्हणून वापरल्या गेल्या तरच उत्तम.


जमिनीला भूमीला एका प्रकारचा वास येतो. त्यानुसार वास्तू परीक्षण काळीभोर माती आणि तेलासारखा। वास येत असेल तर अशी जमीन फक्त शेतीसाठी योग्य आहे. लाल  मुरमाड भूमी आणि मधासारखा वास येत असेल तर राहण्यास फार उत्तम. मातीचा सुंदर वास येत असेल तर भरभराटकारक जमीन असे वास्तू परिक्षणनाचे विविध ठोकताळे आहेत. माती हे अनुक्रमे दूध ,पाणीमध  यामध्ये भिजून पाण्याचे शिंतोडे मारून त्यात गहू व बार्ली पेरावेत . त्या मातीत गहू प्रथम उगवून आल्यास उत्तम आणि बार्ली प्रथम आल्यास मध्यम.


🙏🙏धन्यवाद🙏🙏    

     ⚜️⚜️शुभं भवतु⚜️⚜️

माहिती आवडल्यास अवश्य कॉमेंट्स करा व आपल्याला वास्तु,ज्योतिष,व अध्यात्मिक काही प्रश्न असल्यास अवश्य संपर्क साधावा.




facebook page


https://www.facebook.com/शास्त्री-गुरुजी-100335455444385/


 Whatsapp Link


https://wa.me/message/COCUPN3HXQ3CP1


  माहिती आवडल्यास अवश्य Like करा आणि इतरांना forward करा.




ज्योतिर्विद :-शास्त्री गुरुजी

वास्तुशास्त्र घरातल्या मंदिरासाठी टिप्स

 ॐवास्तुपुरुषाय नमः


वास्तुशास्त्राप्रमाणे शास्त्रकारांनी जो दिशेचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी त्यामध्ये त्या-त्या दिशेला असलेल्या ऊर्जेचा अभ्यास करून त्या वास्तुमधील सकारात्मक उर्जेचा उपयोग त्या मध्ये राहणाऱ्या लोकांना कसा जास्तीत जास्त होईल .लक्षात ठेवून अभ्यास केलेल्या विविध गोष्टींची याचना करावयास त्यानुसार त्यांनी सांगितलेले आहेत. यामध्ये महत्त्वाचा विषय देव्हारा आहे .

ज्या भगवंतांनी आपल्यावर कृपा करून आपणास वास्तू मिळवून दिली जीवनातील सर्व घटनांवर आणि कृत्यामुळे त्याची नजर आहे ,जो आपणास संकटातून मुक्त करतो , अशा परमेश्वरास आपल्या घरात त्याचे स्वतःचे वेगळे घर असणे केव्हाही चांगलेच देवघर बंगला किंवा घराच्या ईशान्य कोणात असावे.पूर्वेस तोंड करून म्हणजे पश्चिमेला दार असेल तर उत्तमच. फक्त दक्षिणाभिमुख देव्हारा ठेवू नका .


ईशान्य कोपऱ्याच्या खोलीत पश्चिमेस देवांचे मुख करून किंवा पूर्वेस देवांचे मुख करून ठेवावे ईशान्य खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात देवाची समई किंवा दिवा लावावा.

जागेअभावी दोन किंवा तीन खोल्या असतील तर शक्यतो कोणत्याही खोलीच्या ईशान्येला देवघराची रचना करावी. 

छोटे देवघर असल्यास ते जमिनीवर ठेवावे लटकावून अडकवून ठेवू नये .देव्हाऱ्यावर अपवित्र वस्तू किंवा अडगळवस्तु ठेवू नये. कित्येक घरात मी देव पाहिले आहेत पण त्या देवांची कधी पूजा होत नसावी अशी अवस्था असते म्हणून देवघर स्वच्छ व सुंदर, पवित्र असावे.

 रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी .रोज एक तेलाचा दिवा किंवा तुपाचे निरांजन लावले तर फारच उत्तम. दर गुरुवारी धूप जाळावा. जुने जीर्ण आणि खराब बंगले फोटो अगर मूर्ती किंवा एकापेक्षा जास्त मूर्ती विधिविहित विसर्जित कराव्यात.

नैऋत्य कोपर्‍यात देवघर झाडण्यासाठी चा झाडू ठेवावा.

वायव्य कोपर्‍यात सहाण चंदन ठेवावे .ईशान्य कोपर्‍यात पाण्याचे भांडे किंवा भरलेल्या तांब्याचा कलश ठेवावा.

 दक्षिणेला तोंड करून कोणत्याही देवतांच्या तसबीरी किंवा मूर्ती ठेवू नये . दैवतांची मुख एकमेकांसमोर येतील असे ठेवू नये. पूजा घरास लाकडाचा उंबरठा अवश्य करून घ्यावा. दर पौर्णिमेला या उंबरठ्यात गोमूत्रात हळद कालवून त्याचा लेप लावावा .स्त्रियांच्या मासिक पाळी मध्ये देवघरात जाऊ नये देवघरात बसून शिव्याशाप तळतळाट देऊ नये.

जास्तीत जास्त ध्यानधारणा व नामस्मरण करावे. देवाला लावल्या जाणाऱ्या उदबत्त्याही  मंद सुगंध देणाऱ्या असाव्यात.उग्र नसाव्यात. देवघरात नैवेद्य दाखवा पण देवघरात बसून जेवू नये. देवघरात जाण्यापूर्वी पाय धुऊन जावे मद्यपान मांसभक्षण संभोग केल्यानंतर देवघरात जाऊ नये. देवघरात जाण्यासाठी दोन द्वारे असावेत म्हणजे शटरटाईप असावे हेशटर सागाच्या लाकडाची असावे देवघरात शिव शंकराचे लिंग असावे, पण शंकराचा फोटो शक्यतो नसावा ,कारण भगवान शंकर स्मशान प्रिय आहे ते विरागी आहेत.

तसेच त्यांच्या मूर्ती किंवा प्रतिमेचे पूजन होणार नाही असा शंकर भगवान शाप आहे, म्हणून शिवलिंग पूजन ठेवावे व शिवलिंगाची टोकाची बाजू उत्तरेस असावी. देवघरात उभ्या मूर्ती नसाव्यात सर्व विराजमान झालेल्या असावे .रोजच्या पूजेत घंटेचा किणकिणाट करावा. आपल्याकडे पूर्वापार शंख असेल तर रोजच्या रोज पाणी भरून पूजेत ठेवावा ,पण आपणास शंख पूजन माहीत नसले तर स्वतःच्या मनाने करू नये .

कोणतेही देवघराची जेवढे पावित्र्य राखले जाईल, तेवढे आपल्या वास्तुमध्ये आपण शांतता नी समाधान लाभेल.          वास्तुशास्त्राप्रमाणे कोणतेही खोलीची मांडणी करताना नेहमी लक्षात ठेवावे ,की ईशान्येला पवित्रता ,आगन्येला अग्नि, नैऋत्येस जड, बोजड वायव्येला दरवाजा किंवा खिडकी, दक्षिण वर्ज्य,उत्तर  सर्वोत्तम, पूर्व आणि पश्चिम उत्कृष्ट सर्व वास्तुशास्त्र याच नियमांभोवती  फिरत राहते.

देवघरामध्ये कासवावरील श्रीयंत्र (स्फटिकाचे)असेल तर लक्ष्मीसपुरवठा येतो.

देवघरात नुसतेच शंकराची पिंड नसावी त्याबरोबर नाग व नंदी असावा.

आपल्या भाग्यंका नुसार भाग्य यंत्र देवघरात असावे .त्या बाबत माहिती आपण घेणार आहोत.

चॅटिंग मशीन (मंत्र फोटो) द्वारेआपल्या आराध्य देवतांचे सतत नामस्मरण ठेवावे.

उदा:-गण गण गणात बोते .

                                                                                                                     🙏 धन्यवाद .🙏

                                                                                                                         शुभं भवतु.


आपल्याला वास्तु,ज्योतिष,व अध्यात्मिक काही प्रश्न असल्यास अवश्य संपर्क साधावा.


facebook page

https://www.facebook.com/शास्त्री-गुरुजी-100335455444385/


  Whatsapp Link

https://wa.me/message/COCUPN3HXQ3CP1

  माहिती आवडल्यास अवश्य Like करा आणि इतरांना forward करा.


ज्योतिर्विद :-शास्त्री गुरुजी

 जिन लोगों को आप बहुत बड़ा समझते हैं,और जिनका नाम बहुत बड़ा है असल में वह कभी बड़े नही होते.क्योंकि वह बड़ी बड़ी बातें करते है पर उस का आत्मसात न...