shree purohit

Enter your email address:

Delivered by FeedBurner

रविवार, २१ मार्च, २०२१

 जिन लोगों को आप बहुत बड़ा समझते हैं,और जिनका नाम बहुत बड़ा है असल में वह कभी बड़े नही होते.क्योंकि वह बड़ी बड़ी बातें करते है पर उस का आत्मसात नही करते ,बल्कि जिन लोगों हम शायद छोटा समझते हैं .

असल में वही ग्यानी और विनम्र निकलते है .

विचार भिन्नता हो, पर विचार शून्यता कभी ना हो.

मंगळवार, १६ मार्च, २०२१

आनंदी जीवन

 _*आनंदि जिवन.....*_


_एक छोटंसं चेहऱ्यावरील हास्य या दोघांच्या ही जीवनातील दुःख लपवते ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य असते न ते त्याचं दुःख त्याची गरिबी त्याचा शारीरिक आजार लपवते आणि त्यांची संपत्ती किती आहे हे सांगते.आजच्या धावपळीच्या युगामध्ये,आनंदी राहणे हसत खेळत राहणे नाही जमत सहसा कोणाला पण हे चित्र पाहून समजते की हे किती बिनधास्त जीवन जगत आहेत.याना उद्याच काहीच देणं- घेणं नाही यांना फक्त आजच्या पुरते पडले आहे आज काम करायचे मस्तपैकी जेवण करायचे जे खायचे ते करायचे किंवा हॉटेल मधून आणून जेवायचे कोणती बीपी ची गोळी नाही न शुगर ची गोळी नाही न कोणत पत्य पळायचं नाही,काही जाणवत नसले का यांना कडक ऊन आहे.दगड वाहायचे आहेत काहीतरी लागेल याची कोणतीच भीती नाही अगदी सहज काम करत ते ही हसत खेळत काम करतात,एकीकडे असे पण लोक दिसतात की भरपूर पगार आणि ए.सी,पंखा याच्या खाली बसून काम करून सुद्धा सतत टेंशन चेहरा पडलेला असतो आणि सतत काही न काही रडगाणे असते.याचे पगार पुरत नाही,मुलं शिकतात हे असं झालं ते तस झालं कर्ज आहे असं काही पण बडबडत राहतात स्वताची मानसिकता हलवून घेतात.आणि एखाद्या अजाराला मुकतात याला जीवन नाहीत म्हणत हो!तुमचं जीवन हे सोपं आहे त्याला तुम्ही अवघड करत बसतात,उगीच काहीपण विचार नका अणु तुम्ही मनात एवढंच वय आहे पैसे कमवण्याचं तोपर्यंत पैसे कमावले पाहिजेत तुम्हाला पैसा अशी गोष्ट आहे न त्याची भूकच नाही भागत किती ही वय होऊ दे किंवा कोणताही आजार होऊ दे माणसाची पैसे कमावण्याची भुक संपत नाही,मला असं म्हणायचं नाही की पैसे कमवू नका पैसे अवश्य कमवा पण त्या पैश्याचा आपल्याला उपयोग झाला पाहिजे असे कमवा आणि स्वताच्या शरीराचा मानसिकतेचा विचार करून कमवा आनंदीत रहा.आपल्याला आपल्या जीवनाचा प्लस पॉइंट लक्ष्यात आला न की जीवन जगायला खूप सोपे जाते.माणसाने समाधान मानले पाहिजे प्रत्येक गोष्टीच समाधान मानले पाहिजे. *चांगलं पण थोडंच जेवण करा,पाणी एक पट प्या,दोन पट चाला,तीन पट हसा जो आपल्याबद्दल सतत चांगला पॉझिटिव विचार करतो अश्या लोकांना ज्यास्त वेळ द्या हाच एक आनंदी जीवन जगण्याचा मंत्र असु शकतो...*_


_*मिञांनो,काळजी घ्या.....*_

संघटन

 *खास स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजणाऱ्यांसाठी*


*संघटना काय असतॆ...*


              *एक कार्यकर्ता होता. तो नेहमी त्याच्या संघटनेत सक्रिय होता. तो सर्वांना परिचित आणि आदरणीय होता. अचानक तो काही कारणास्तव निष्क्रीय झाला आणि संघटनेपासून दूर गेला.*


                 *काही दिवसानंतर अत्यंत थंडीच्या रात्री त्या संघटनेच्या प्रमुखांनी त्याला भेटायचं ठरवलं. संघटना प्रमुख त्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले, तॆव्हा तो कार्यकर्ता घरात एकटाच आढळला. शेकोटीत जळत्या लाकडाच्या ज्वाळासमोर बसून ऊब घेत होता. अग्निही गरम होत होती.  त्या कार्यकर्त्याने प्रमुखांचे फार शांतपणे स्वागत केले. दोघे शांतपणे बसले होते. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते. फक्त शेकोटीतील अग्नि पेटत होता.*

  

              *थोड्या वेळाने संघटना प्रमुखांनी काहीच न बोलता शेकोटीतील एक पेटते लाकूड उचलून बाजूला ठेवले आणि पुन्हा जागेवर बसले. कार्यकर्ता सर्व गोष्टींकडे लक्ष देत होता. बर्‍याच दिवसांपासून एकटे राहिल्यामुळे त्याच्या मनालाही आनंद होत होता. परंतु त्याने पाहिले की, विभक्त लाकडाच्या आगीची ज्योत हळूहळू कमी होत आहे. काही वेळातच आग पूर्णपणे विझली. त्यात उष्णता शिल्लक नव्हती.*


                *काही काळापूर्वी, ज्या लाकडाकडे एक ऊबदार प्रकाश आणि ज्वाळा होती, तो काळ्या आणि निस्तेज तुकड्यांशिवाय काहीही उरला नव्हता.*


*दरम्यान...*

*दोघांनी एकमेकांना कमीतकमी शब्द बोलून अभिवादन केले.*


                *संघटना प्रमुखांनी निघण्यापूर्वी बाजूला उचलून ठेवलेले लाकूड उचलले आणि ते पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवले. ते लाकूड पुन्हा प्रज्वलित झाले आणि ज्वाला बनल्यामुळॆ त्याभोवती प्रकाश आणि उष्णता पसरली. जेव्हा तो कार्यकर्ता संघटना प्रमुखांना सोडण्यासाठी दाराजवळ पोहोचला तेव्हा तो प्रमुखांस म्हणाला माझ्या घरी येऊन भेटल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज आपण काहीही न बोलता एक सुंदर धडा शिकविला आहे.*


*एकट्या व्यक्तीचे अस्तित्त्व गौण असते. जेव्हा ती संघटनेत कार्यरत असते तेव्हा ती प्रज्वलित होत असतॆ. मात्र जेव्हा ती संघटनेपासून विभक्त होते तेव्हा ती एखाद्या लाकडासारखी विझते. ज्यांची ओळख संघटनेनेच बनविली आहे, त्यांच्यासाठी संघटना सर्वोतपरि व सर्वश्रेष्ठ असावी.🙏🏻*


     *म्हणून सर्वानी  संघटीत रहा..!*


🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 _*एखादे घर सारखे आजारी पडण्याची कारणे माहितीयेत का?...*_



_घरातील एक व्यक्ती आजारी पडणं हि गोष्ट आपण सगळे ऐकून आहोत.परंतु घरातली प्रत्येक व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तर त्यामागे अनेक प्रकारची मानसिक कारणे असण्याची दाट शक्यता असते.म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीचे आपापसातील असणारे संबंध,एकमेकांना स्वतःचे विचार मांडण्याची स्पेस,एकमेकांना केले जाणारे साहाय्य,समजूतदारपणा,सामाजिक भान इ.अनेक कारणे अशी आहेत ज्यामुळे घराची मानसिक स्थिती सुदृढ आहे कि निकृष्ट आहे,याविषयी अनेक मते मांडता येतील.किंबहुना एखादे घर मानसिकरीत्या आणि शारीरिकरीत्या वारंवार आजारी पडत असेल तर त्यामागे सुद्धा वरील हि कारणे कारणीभूत असतात.काही महत्वपूर्ण कारणे पाहुयात._

_घरातल्या कौटुंबिक रचनेत असमजूतदारपणा असल्यास त्याचा त्रास घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर होत असतो.यामध्ये एकमेकांना अजिबात समजून न घेणे किंवा एखाद्याच सदस्याला अति प्रमाणात समजून घेणे असे वातावरण असल्यास वादविवाद होऊन चिंता-अतिविचार सारख्या लक्षणांना व्यक्ती बळी पडते._

_जेव्हा एखाद्या घरात जबाबदार व्यक्तीला स्वतःची स्पेस मिळत नाही किंवा अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत स्पेस दिला जात नाही.एकच व्यक्ती स्वतःचा निर्णय सर्वांवर लादत असल्यास अशा घरातले वातावरण नेहमी डिप्रेसिव्ह प्रकारातलेच असणार.ताण निर्माण होऊन किंवा दडपण वाढून हायपरटेन्शनला सामोरे जावे लागते._

_चिडचिड करणारं घर असेल आणि त्याठिकाणी संयम नावाची कोणतीही गोष्ट नसेल तर अशा घरी सदैव टोकाकडची भांडणे पहायला मिळतात.शिव्यागाळ करणे,एकमेकांना शारीरिक नुकसान पोहोचवणे,घरातल्या वस्तूंची मोडतोड करणे इ थरापर्यंत राग व्यक्त केला जात असेल तर त्याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम हा होणारच आहे._

_सतत हा असाच,तो तसाच एकाचं कौतुक करणं आणि त्याच व्यक्तीबद्दल दुसरीकडे वाईट बोलणं.हे सगळे हेवेदावे व्यक्तीचे व्यक्तिमत्व संकुचित बनवतात.इतर नातेवाईकांकडे न जाणे,२४ तास घरालाच चिटकून राहणे यामुळे मेंदूला तोचतोचपणाची सवय लागते आणि मेंदू आजारापासून लवकर बरा होण्याची शक्यता कमी होते._

_मी हे करू शकत नाही आणि तू सुद्धा करू शकणार नाही.असे सतत नकारार्थी वाक्य स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरणे.यांमुळे असणारा आत्मविश्वास कमी होऊन कोणताही आजार जेव्हा जडतो तेव्हा त्यातून बाहेर न पडण्याला किंवा आजार दीर्घकाळापर्यंत टिकण्याला हेच नकारार्थी वातावरण खतपाणी देत असते._

_एखादे कुटुंब ज्यावेळी भविष्याचा अतिविचार करते,असं झालं तर-तसं झालं तर,पुढे कसं होईल आपलं,अशा अतार्किक गोष्टींमध्ये विनाकारण स्वतःला गुरफुटून ठेवते त्या घरातली लोकं सतत आजारी पडताना दिसतात.भविष्यात काय होईल हे कोणाच्याही हातात नसून त्याबद्दल विचार करून करून सध्याचा वर्तमान बाधित होत असतो._

_एखाद्या कुटुंबात पुष्कळ प्रमाणात जनरेशन गॅप असेल आणि त्यातून एकमेकांना हवी तशी स्पेस मिळत नसेल.काही पारंपारिक गोष्टी सोडाव्या लागत असतील किंवा त्या करण्यासाठीची जबरदस्ती केली जात असेल तर मनातली गोंधळाची स्थिती वाढते आणि एकमेकांविषयी राग उत्पन्न होतो._

_सतत गृहीत धरणे,ती व्यक्ती अशीच आहे असा लेबल लावणे आणि त्या व्यक्तीला तशाच पद्धतीची वागणूक दिल्यास अंतर्गत वाद निर्माण होऊन डोकेदुखी सारखे गंभीर शारीरिक परिणाम निर्माण होऊ शकतात._

_*डोकेदुखी,थायरॉईड,ब्लड प्रेशर,शुगर,कँसर,अपचन,डिप्रेशन,चिंता,भिती,बैचेनी,अतिविचार या सर्व टोकाकडील समस्यांमागे आपल्या घरातील वरील हि कारणे असू शकतात.ती शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना केल्यास किंवा प्रशिक्षित समुपदेशकाची मदत घेतल्यास निश्चित यातून बाहेर पडण्याची दिशा आपल्याला मिळू शकते....*_


_*मिञांनो,काळजी घ्या.....*_

कोरोना लस का घ्यावी

*प्रश्न तुमचे - उत्तर शासकीय आरोग्य सेवेचे*



*शासकीय कोविड लसीकरण केेंद्र*

 


 

*1) लस का घ्यावी़?*

कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे.


*2.लसिकरणाची कार्यक्षमता आहे का?*

सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.  


*3. लस सुरक्षित आहे का?* 

सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत.


*4. आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का?*

आता तरी सगळीकडे कोविशिल्ड - सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे नामको लसिकरण सेंटरला जे उपलब्ध आहे ते घ्या. 


*5. दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते?*

६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येवून नोंदणी करावी.


*6. लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होवू शकतात?*

ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे  सर्व सामान्य 

दुष्परिणाम  साधरणपणे दिसतात. ते 

१ ते २ दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल/क्रोसीन या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत. वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वीत झाल्याचे लक्षण आहे.


*7. लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?*

लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे. उपाशीपोटी जावू नये. लसिकरण सेेंटरवर कमी जास्त वेळ लागु शकतो त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्कीटे, कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घेवून जावे. तसेच जातांना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेवून जावे.


*8.लस किती वेळा घ्यावे?*

पहिला डोस घेतला की साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.


*9. कॅन्सर व इतर आजाराच्या रूग्णांनी लस घ्यावी का?*

नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसिकरण करून घ्यावे. 


*10. ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?*

१०० टक्के.... मुळात लस याच लोकांसाठी बनली आहे ज्यांना असे आजार - Co-morbidity  आहेत. फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रूग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्याने लसिकरण करावे.


*11. ॲलर्जीक ब्रोन्कायटीस  (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?*

नक्कीच घेऊ शकता परंतु ॲलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा  सल्ला घ्यावा. 


*12. कोविड होवून गेल्यावर पण लस घ्यावी का?*

हो १०० टक्के कारण कोविड नंतर बनणा-या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधी पर्यंत राहतात.


*13. नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी?*

कोविड होवून गेल्यावर ८ ते १२ आठवडयांनी लस घ्यावी.


*14. मी सर्व नियम पाळतो मला वर्षभरात कोरोना झाला नाही, माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे तरी मी लस घ्यावी का?*

१०० टक्के...... हो


*15. लहान मुलांना लस दयावी का?*

१६ वर्षाखालील मुलांना देवू नये.


*16. गर्भवती महिलांना लस दयावी का?*

सध्या त्याचा डेटा उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी देवू नये.


*17. लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?*

हो. लसिकरण नंतरही हलगर्जिपणा करून चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.


*18. लस नंतर १०० टक्के कोरोना होणार नाही का?*

असे अजिबात नाही पण झाला तरी तो सौम्य असेल.


*19. जर लस घेवूनही कोरोना होणार असेल तर लसिचा हेतू काय?*

१. कोविडची दुसरी लाट टाळणे.

२. मृत्यू दर कमी करणे.

३. गंभीर रूग्णांचे प्रमाण कमी करणेे.


*20. लस घेतल्यावर रोग प्रतिकारक शक्ती कधी तयार होणार?*

पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसानंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते पण त्यासाठी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.



*प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयात  कोव्हीड लसीकरण  सकाळी ९ ते सायंकाळी 5 पर्यंत  सोमवार,बुधवार, शुक्रवार या दिवशी  उपलब्ध आहे, ४५ ते ५९ वयोगटातले व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील सर्वांनी हे लसीकरण करून स्वतःला व आपल्या परीवाराला कोरोना संक्रमणापासुन सुरक्षीत ठेवा.* 

प्रतिमा

 _*प्रतिमा....*_


_आपण आपले आयुष्य कसे जगतो हे जास्त महत्त्वाचे की आपल्या कडे समाज कोणत्या दृष्टीने पाहतो हे महत्त्वाचे?वरवर पाहता या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतील सगळ्यांना.हा काय प्रश्न आहे असेही काही जण विचारतील.पण आपले स्वतःचे आयुष्य मनासारखे जगता यावे म्हणून सगळेजण धडपडत असतात.त्याच बरोबर लोकमानसात आपली प्रतिमा ही चांगली असावी असं ही सगळ्याना वाटते.आणि ही तारेवरची कसरत करताना सगळ्यांची खूप दमछाक होते हे नक्कीच!म्हणजे आपण सगळे जसं म्हणतो की राजकारणात स्वच्छ प्रतिमा असणे खूप गरजेचं आहे,त्याचबरोबर मोठं पद मिळाल्यानंतर ती प्रतिमा जपणं हे पण तितकेच महत्वाचे.पण वास्तविक पाहता असं फारच कमी लोकांच्या वाट्याला येते की मोठं पद आणि स्वच्छ प्रतिमा.सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात देखील काहीसं असेच असतं हो ना?घर,नोकरी,व्यवसाय सांभाळून आपलं स्वतःच वेगळे अस्तित्व निर्माण करणे,त्याचबरोबर स्वतःचे छंद जोपासणे,आपल्या अंगीभूत कलेला वाव देणं आणि परत समाजात चांगली प्रतिमा निर्माण करणं हे सर्वांनाच जमते असं नाही.ज्यांना हे सगळं जमते त्यांचे खरंच अभिनंदन करायला हवं.पुष्कळ वेळेस आपण आपल्या कलागुणांना वावच देत नाही किंवा आपल्या मनात असलेलं आयुष्यच जगत नाही.हा काय म्हणेल?ही काय म्हणेल अस करत-करत सगळं आयुष्य निघून जाते.आणि उरतात फक्त क्लेशदायक संवेदना.अरे!आपण त्यावेळी अस केलं असते तर खूप पुढे गेलो असतो,त्या वेळेस जर थोडंस धाडस केले असते तर या जगण्यांला अर्थ मिळाला असता,पण काय करू?परिस्थिती तशी नव्हती. *मित्र-मैत्रिणीनो,आपल्याला सूट होईल अशी परिस्थिती कधीच आयुष्यात येत नसते.आपणच ती परिस्थिती आपल्या बाजूने करायची.नियती त्याच्या सोंगट्या टाकत राहते.पण आपण त्या सोंगट्या कश्या वापरतो हे आपल्या हातात आहे.परिस्थिती आपोआपच तुम्हाला योग्य होत राहते.*_

_*बघा विचार करा....*_


_*मिञांनो,काळजी घ्या.....*_

-:♦ कपाळी गंध कशासाठी लावायचे ? :------------ -:♦ ते नेमके कुठे लावावे ? :------------

 .                ●┈┉┅━❀꧁ॐ꧂❀━┅┉┈●


-:♦ कपाळी गंध कशासाठी लावायचे ? :------------ 

-:♦ ते नेमके कुठे लावावे ? :------------ 


                 ●┈┉┅━❀꧁ॐ꧂❀━┅┉┈●


|| कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत 

|| चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी 

|| कमी पणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे 

|| अनेक फायदे आहेत. त्याच प्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे 

|| आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा करण्याचाही हेतू 

|| आहे म्हणूनच ईशपूजनानंतर पूजकाने आपल्या कपाळी 

|| गंध लावण्याची प्रथा पडली. गंध म्हणजे केवळ कपाळाची 

|| शोभा नव्हे, तर बुद्धीचेही पूजन आहे. ईश्वर हे साध्य, 

|| तर बुद्धी हे साधन असल्याने बुद्धीची पूजा करणे 

|| आवश्यकच आहे. 


|| गंध हे मांगल्याचेही प्रतीक आहे. कपाळी गंध लावलेला 

|| माणूस आणि गंध न लावलेला माणूस यातला फरक 

|| लगेच लक्षात येतो. गंधामुळे माणूस शुचिर्भूत बनतो. 

|| त्याचा चेहऱ्यावर मांगल्याचे भाव दिसू लागतात. 

|| आकाशाने देखील यासाठीच सूर्य-चंद्ररूपी दोन तिलक 

|| दिवसा व रात्री धारण केले आहे. मात्र हे गंध दोन्ही 

|| भुवयांच्या मध्ये { आज्ञाचक्रात } कधीही लावू नये. ते त्या 

|| वरील भागात लावावे. कारण आज्ञाचक्राच्या ठिकाणी 

|| असलेला सुप्तावस्थेतील तृतीय नेत्र बंद होता कामा नये.


|| नित्य गंध लावणारा मरणोत्तर वैकुंठलोकी जातो असे 

|| धर्मशास्त्र सांगतात.गंध लावण्याचा अधिकार प्रत्येक 

|| वर्णातील पुरुषाला आहे; श्रीकृष्णाचे उपासक उभे गंध 

|| लावतात, तर शिव उपासक आडवे गंध लावतात. गंध 

|| चंदनाचे, केशराचे, रक्तचंदनाचे व गोपीचंदनाचे जसे 

|| आवडेल तसे लावावे. बाहेर जाताना गंध लावून जाण्याची 

|| लाज वाटत असेल, तर निदान देवपुजेनंतर तरी कपाळी 

|| गंध आवर्जून लावावे.


-:♦ स्नान झाल्यावर कपाळावर टिळा, गंध का लावतात ? 


|| आपला देह म्हणजे ईश्वराचे मंदीर आहे. मंदिरात जो सर्वत्र 

|| ईश्वरी भाव असतो तसाच देहात रोमारोमात होणारे स्फुरण 

|| हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते. हे ईश्वरी तत्व विशेष 

|| करून मर्म स्थानात प्रतीतीस येते. भ्रुकुटीचे मध्यभागी 

|| आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करतो. देहाला मायेची 

|| उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे प्रशस्त 

|| असते. 


|| म्हणून स्नान झाल्यावर कपाळाचे मध्यभागी असणाऱ्या 

|| परमेश्वराच्या मूर्तीस टिळा लावावा. म्हणजे ही सुद्धा एक 

|| छोटी देवपूजा असते. ज्यांना कामाचा भरपुर व्याप असून 

|| श्वास घ्यायला देखील फुरसत मिळत नाही अशा माणसांनी 

|| स्नान झाल्यावर किमान कपाळी टिळा तरी लावावा. 

|| त्या निमित्ताने भगवंताची पूजा होते. 


|| टिळा लावताना मधल्या बोटाने लावावा, मधल्या बोटाचा 

|| संबंध हृदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणारी 

|| स्पंदने हृदयापर्यंत जाऊन भिडतात. जप करताना सुद्धा 

|| मधले बोट वापरतात. त्यामुळे दिवसभर मन शांत व 

|| भक्तिभावाने राहते. टिळा लावल्यामुळे मनुष्य सहसा पाप 

|| कर्माकडे वळत नाही. कारण जो टिळा लावतो तो देवाला 

|| मानतो. 


|| समाज देखील त्याच्याकडे सन्मानाने बघत असतो. हिंदू 

|| धर्माखेरीज इतर कोणत्याही धर्माचे लोक टिळा लावत 

|| नाहीत. या बाबतीत कठोप निषदात असे सांगितले आहे. 

|| की हृदयातून निघणाऱ्या शंभर प्रमुख नाड्यांपैकी सुषुम्ना 

|| ही नाडी मस्तकाच्या समोरील भागातून निघते. यातूनच 

|| मोक्ष मार्ग निघत़ो जो ऊर्ध्व दिशेने जातो. माणसाचा मृत्यू 

|| झाल्यावर जीवात्मा या मार्गाने गमन करता झाला तर 

|| त्याला त्वरित गती मिळते. म्हणूनच कपाळी तिलक धारण 

|| करतात. 


-:♦ चंदनाच्या टिळ्याला महत्त्व आहे :------------ 


|| कारण नाकातून वाहणाऱ्या दोन नाड्यांपैकी एक धन व 

|| दुसरी ऋण असते.धन नाडीतून श्वास वाहताना निर्माण 

|| होणारी उष्णता रोखण्या साठी चंदन तिलक महत्वाची 

|| कामगिरी बजावतो. कपाळावर टिळा लावताना औषधी 

|| चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्ण चंदन, बुक्का 

|| इत्यादीचा शुद्ध टिळा लावावा.


-:♦ टिळा लावणे :------------ 


|| टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मानाने पाहतात. 

|| आर्य धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे ही प्रथा 

|| आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो. 


उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे.


-:♦ पण टिळा लावण्या मागे काय भावना असते ? :------- 


|| पुराणामध्ये असे लिहिलेले आहे की, संगमाच्या 

|| किनाऱ्यावर "गंगा स्नान" केल्या नंतर साधू / पंडिताद्वारे 

|| टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते. कपाळावर टिळा 

|| लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या शरीरात 

|| सात { ७ } सुक्ष्मउर्जा केंद्र आहे जे अपार शक्तीचे भांडार 

|| आहे. त्यांना "चक्र" असे म्हणतात.


|| कपाळाच्यामध्ये जिथे आपण टिळा लावतो, तिथे आज्ञा 

|| चक्र असते. हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात 

|| महत्वपूर्ण स्थान आहे.


-:♦ इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या :------------


१ } इडा, २ } पिंगला आणि ३ } सुष्मना 


|| येऊन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण 

|| म्हणतात. हे गुरु स्थान आहे. इथूनच पूर्ण शरीराचे संचालन 

|| होते. हे आपल्या चेतनांचे मुख्य स्थान पण आहे. याला 

|| मनाचे घर पण म्हणतात. यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात 

|| सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योगामध्ये ध्यान करता 

|| वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. टिळा 

|| लावल्याने  स्वभावात चांगले बदल घडून येतात व 

|| पाहणाऱ्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो. 


-:♦ टिळा काही खास प्रयोजनासाठी पण लावतात :----- 


१ } जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..

२ } शत्रूचा नाश करायचा असेल तर तर्जनीने, 

३ } धनप्राप्ती हेतू मध्यमानी आणि

४ } शांती प्राप्ती साठी अनामिकानि टिळा लावला जातो.


|| साधारणत : टिळा अनामिकेद्वारे लावला जातो आणि 

|| त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.


|| तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व 

|| थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले 

|| असते. म्हणून टिळा जरूर लावावा. आर्य प्रथेप्रमाणे टिळा 

|| न लावणे अशुभ आहे. टिळा आर्य संस्कृती ची ओळख आहे 


|| टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण 

|| कपाळावर टिळा लावण्याच महत्व : हिंदू धर्मात पूजा 

|| करताना टिळा लावण्याची प्रथा आहे. पूजाच कशाला 

|| इतर मंगल कार्याची सुरूवातही गंध लावूनच करण्यात 

|| येते. गंध लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत 

|| नाही.


|| कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते. पूजेच्या 

|| वेळी कुंकुम टिळा किंवा चंदनाचा टिळा लावतात. 

|| हा टिळा कपाळा वर किंवा दोन्ही भुवयांच्या मधोमध 

|| लावण्याची प्रथा आहे. अनामिकेच्या खालचा भाग हस्त 

|| ज्योतिषानुसार सूर्यक्षेत्र मानले गेले आहे. 


|| कपाळावर आज्ञा चक्राचे स्थान आहे. सूर्याच्या बोटाने 

|| टिळा लावल्याने मुखमंडल सूर्याप्रमाणे तेजस्वी बनू लागते. 

|| तसेच आज्ञाचक्रही जागृत व्हायला मदत होते. यामुळे 

|| मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. टिळा लावणारा 

|| यशस्वी आणि ओजस्वी बनतो.


-:♦ कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी :--- 

-:♦ महत्त्व कपाळावर का लावतात चंदनाचा टिळा ? :--- 


-:♦ पूजा :------------ 


|| विधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे. 

|| भारतात नियमित देवपूजेमध्ये देखील चंदनाचा वापर 

|| केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींना देखील 

|| विज्ञानाचा आधार आहे.  मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा 

|| लावण्यामागील आरोग्य दायी कारण. 


-:♦ वैज्ञानिक आधार :------------ 


|| कपाळावर दोन भुवयां मध्ये ‘अग्न’ चक्राचे स्थान असते. 

|| या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ म्हणतात. हे एक उर्जा स्थान 

|| असल्याने अध्यात्मात  या स्थानाला विशेष महत्त्व आहे. 

|| म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा 

|| आरोग्यदायीदेखील ठरते.


-:♦ चंदनाच्या टिळ्याचे ३ फायदे  :------------ 


१ } एकाग्रता सुधारते ♦:------------ 


|| आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांच्या मते, तिसरा 

|| डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. 

|| चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास 

|| आणि एकाग्रता  वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे 

|| चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता 

|| मिळवण्यास मदत करते.


२ } डोकेदुखीपासून आराम मिळतो ♦:------------ 


|| चायनिज अ‍ॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयां मधील जागा ही 

|| शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. 

|| त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखी पासून 

|| आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा 

|| टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने 

|| डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत 

|| होते.


३ } सकारात्मक बनवते ♦:------------ 


|| तिसर्‍या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे 

|| केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी 

|| नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते. 

|| मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.


४ } निद्रानाश आणि ताण-तणावापासून आराम ♦:--------- 


|| अतिथकवा, मानसिक ताण किंवा अतिउत्साही 

|| मनामुळेदेखील निद्रानाश होण्याची शक्यता असते. 

|| आयुर्वेदानुसार कपाळावरील या स्थानावर चंदनाने मसाज 

|| केल्यास ताण कमी होण्यास तसेच निद्रानाशाच्या 

|| समस्येवर मात करण्यास मदत होते.


५ } शरीरात थंडावा निर्माण होतो ♦:------------ 


|| चंदना मध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण 

|| करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या 

|| दूर होतात. सोबतीलाच नसांना देखील थंडावा मिळतो. 

|| भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन 

|| लावणे तुमच्या साऱ्या शरीराला थंड करण्यास मदत करते. 


|| जयहरी विठल रामकृष्ण हरी ज्ञानोबामाउली तुकाराम ||

परमात्म्याच स्वरूप

 जग काय आहे तर ते परमात्मास्वरूपच आहे. त्या परमात्मस्वरूपाची तीन अंगे आहे. तो सच्चिदानंद आहे. सत, चित व आनंद. आनंद हे त्याचे खरे स्वरूप आहे. कारण प्रेरणा तिथूनच येते. सारखा आनंद बाकीच्या गोष्टी आनंदामध्ये आपोआप येतात.जर हे विश्व आनंदमय आहे आणि हा अनुभव सत्पुरुषांना आहे तर मग हे जग सुद्धा आनंदमय असलं पाहिजे. आम्हाला ते दिसत नाही. आता समजा  प्रत्येक व्यक्ती हा मणी समजला आणि ते एका धाग्यात   ओवलेले  आहे आहेत. मग ते सुद्धा आनंदमय असले पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. जर असं आहे तर मग दुःख करण्याचे कारणच काय ? या आंनदाचे स्वरूप मी विसरतो तेव्हा दुःख आहे, हे त्याच्या इच्छेने आहे, हे मी विसरतो. आपल्या दृष्टीने सुख आणि दुःख आपण बघू तसं आहे. एक नारायण बुवा जालवणकर म्हणून दत्त भक्त होते. त्यांना लग्न करायचे नव्हते. आईने आग्रह केला म्हणून लग्न केले. बाळंतपणात त्यांची बायको मेली म्हणून त्यांनी गावात पेढे वाटले.कारण पाशातूनमुक्ती मिळाली. ही श्रुष्टी जर आनंदमय आहे तर आपण आपल्या मनाची धारणा जी आहे ती  बदलली की झालं. ती धारणा बदलायला तो अंतर्यामी आहे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे. प्रत्येक घटनेमध्ये त्याचा हात आहे ही जाणीव सतत ठेवली पाहिजे . हे ती धारणा बदलणं आहे.

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात? माहितीय???

 दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात? माहितीय??? 


आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून वापस आल्यावर मंदिराबाहेरील #ओट्यावर किंवा #पायऱ्यांवर बसायला पाहिजे.


परंतु तुम्हाला माहितीय का की या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे?

आजकाल काही लोकं दर्शनाला जातात आणि वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांवर बसतात आणि तिथं बसून #व्यावसायिक किंवा #राजकीय चर्चा सुद्धा करतात.

परंतु ही #प्राचीन_परंपरा एका विशिष्ट उद्देशासाठी बनवली गेली होती. वास्तविक पाहता आपण सर्वांनी मंदिराच्या ओट्यावर किंवा पायऱ्यांवर बसून एक श्लोक म्हणायला हवा, जो आजकाल बहुतांश लोकं विसरून गेले आहेत.


तुम्ही स्वतः हा #श्लोक वाचायला हवा आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीला पण सांगायला हवा...


श्लोक पुढीलप्रमाणे:-


*अनायासेन मरणम्, बिना देन्येन जीवनम्।*

*देहांते तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम्।।*


या श्लोकाचा अर्थ असा आहे की,


#अनायासेन_मरणम् :-

अर्थात, माझा मृत्यू कोणत्याही पिडे विना म्हणजे त्रासदायक अवस्थेत होऊ नये आणि मी कधीही आजारी होऊन, एका जागेवर पडून त्रासदायक अवस्थेत कष्ठ उचलून होऊ नये. माझा मृत्यू अगदी चालत-फिरत असतानाच्या अवस्थेत व्हावा.


#बिना_देन्येन_जीवनम् :-

अर्थात, माझं जीवन हे सक्तीचं जीवन नसावं, म्हणजे मला कधी कोणाच्या आश्रयाची आवश्यकता पडू नये. जसं की अर्धांगवायू झाल्यानंतर माणूस इतरांवर अवलंबून राहतो, तसं माझं जीवन लाचार बनू नये आणि ईश्वराच्या कृपेने माझं आयुष्य विना भिक्षेचं निघून जावं.


#देहांते_तव_सानिध्यम् :-

अर्थात, मला जेव्हा पण मृत्यू येवो तेव्हा तो मी परमेश्वराच्या समोर असतानाच येवो. जसं पितामह भीष्म यांच्या मृत्यूवेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले होते आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतरच भीष्मांचा मृत्यू झाला होता.


#देहि_मे_परमेश्वरम् अर्थात हे परमेश्वरा मला असं वरदान दे. (वरीलप्रमाणे जे मागितलं आहे ते)


प्रार्थना करताना वरीलप्रमाणे करा आणि लक्षात ठेवा की देवाकडे आपल्याला धन-दौलत, गाडी-बंगला वगैरे मागायचं नाहीय. कारण हे सर्व तर ईश्वर आपल्याला आपल्या पात्रतेनुसारच देत असतो. यामुळेच देव दर्शनानंतर अशीच प्रार्थना करा.आणि ही प्रार्थना आहे, याचना नाही हे लक्षात ठेवा. याचना ही सांसारिक गोष्टींसाठी असते, जसं की धन, घर, व्यापार, नोकरी, मुलगा, मुलगी, सांसारिक सुख किंवा अन्य गोष्टी. ही याचना म्हणजेच भीक आहे.


प्रार्थनेचा विशेष अर्थ असतो अर्थात विशिष्ट, श्रेष्ठ.

प्रार्थना म्हणजे निवेदन.


त्यामुळे ईश्वराकडे प्रार्थना करा आणि प्रार्थना काय करायचीय? तर हा श्लोक म्हणायचा आहे.   *संग्राहक:-  लॉ वसंतराव धाडवे विदर्भ अध्यक्ष कर्जदार जामीनदार हक्क स्वसंरक्षण समिती म.रा.तथा जेष्ट समाज सेवक वाशीम*

राजा आणि प्रजा

 _एका गरीब विधवेच्या मुलाने एकदा 🚀त्याच्या राजाला पाहिले.  राजाला पाहून त्याने आपल्या आईला विचारले "आई! मी कधी राजाशी बोलू शकेन का?"_

_*आई हसलली अाणि शांत राहिली.*_

_त्याच वेळी गावात एक संत आले होते त्या तरूणाने त्याची इच्छा त्याच्या पायाशी घातली._

_*संत म्हणाले-* जा राजाची अाणि तुझी भेट होईल राजा अाशा ठिकाणी राजाचा राजवाडा बांधत आहे, तु तेथे जा आणि मजुरी कर. कामाची काळजी घे, पगार घेऊ नको बदल्यात काहीही मागू नको....._

_तो मुलगा कामावर गेला तो दुहेरी कष्ट करत होता पण पगार न घेता....._

_एक दिवस राजा तपासणी करायला आला.  त्याने मुलाची आवड बघितली. मुकादमाला विचारले- "हा मुलगा कोण आहे, जो इतक्या कष्टाने काम करत आहे? त्याला आज अधिक मजुरी द्या."_

_मुकादमाने विनवणी केली- "महाराज! दोन महिन्यांपासून तो मुलगा उत्साहाने काम करतो पण तो एक विचित्र वागत आहे. मोबदला न घेता काम करत राहतो_ 

_परंतु मला आश्चर्य वाटले की तो  पगार का घेत नाही अाणि वरती म्हणतो.._ 

_*हे माझ्या राजाचे काम आहे ते ही माझ्या घरा सारखेच अाणि घरकामासाठी वेतन कशाचे ?"*_

_राजाने त्याला हाक मारली आणि म्हणाला, "मुला, तू मजुरी का घेत नाहीस?_ 

_तुला काय हवे आहे ते सांग?_

_मुलगा राजाच्या पाया पडला आणि म्हणाला- "महाराज! तुम्हाला पाहीले , तुमची कृपा दृष्टी माझ्यावर पडली, मला माझा पगार मिळाला आता मला आणखी काहीही हवे नाही._

_राजाने त्याला अापल्या बरोबर घेतले.  आणि काही काळानंतर त्याने त्यास प्रधान बनवले एके दिवसी त्याच्या हुषारीवर अापल्या एकुलत्या एका मुलीशी त्याचे लग्न लाऊन दिले...._ 

_राजाला मुलगा नसल्या कारणें नंतर त्याने ते राज्यसुद्धा त्याच्या हाती दिले......_

_*देव राजा आहे.  आम्ही सर्व देव कामगार आहोत , देवाची उपासना करणे म्हणजे मजुरी करणे होय , संत मंत्री असतात , भक्ती ही राजपुत्री आहे , मोक्ष ते राज्य आहे , जर आपण भगवंताच्या स्तोत्राच्या बदल्यात काही मागितले नाही तर देव स्वत: दर्शन देतो , प्रथम त्याला संत बनवितो आणि भक्ती अर्पण करून शेवटी मोक्ष देतो.....*_

_जर मुलगा सकाम कर्म करीत असता तर त्याला फक्त पगार मिळाला असता निष्काम कर्म केल्याने तो राजा बनला....._

_*तुलसी विलम्ब न कीजिए ,*_

_*निश्र्चित भजिए राम.....*_

_*जगत मजूरी देत है ,*_

_*क्यों राखे भगवान.........*_

म्हणून आपल्या परमात्म्याची निष्काम भक्ती आणि सेवा करा 

वेळ आली की परमात्मा तुम्हाला इतके देईल की ठेवायलाही जागा उरणार नाही.      

           🌹🙏🌹

प्रारब्ध

 ✍  *प्रारब्धवशात जे आहे तेच होते....१) लग्न  (२) पैसा  (३)  मरण  (४)  अन्न  (५)  जन्म... हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात...१)  रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. *रावणाची कन्या उपवर झाली.* बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलाविले. *रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून. पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात...२)  पैसा -* ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.... *३) -* ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते.... *कथा -* एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ?  आई म्हणाली,  *आज यमराज आले होते व जाताना हसले."* गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. *यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का ?" यमराज म्हणाले,  "आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो."  त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती... तात्पर्य -* काहींचा मृत्यू एस् टी त, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे... पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे..     🙏🌹

 जिन लोगों को आप बहुत बड़ा समझते हैं,और जिनका नाम बहुत बड़ा है असल में वह कभी बड़े नही होते.क्योंकि वह बड़ी बड़ी बातें करते है पर उस का आत्मसात न...